अत्रे कट्ट्यावर रविवारी व्याख्याते चंद्रशेखर वझे यांचे हास्यचिंतन
पनवेल- नवीन पनवेलच्या आचार्य अत्रे कट्ट्याच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त व्याख्याते चंद्रशेखर वझे यांचा छोट्या छोट्या गोष्टीतून हसत-खेळत चिंतन करावयास लावणारा हास्यचिंतन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.१७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नवीन पनवेलच्या अरुणोदय हॉस्पिटल समोरील सिडको उद्यानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम विनामूल्य असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अत्रे कट्ट्याचे अरविंद करपे यांनी केले आहे.चंद्रशेखर वझे हे सिद्धश्री कालिका धामपीठ वृंदावन-मथुरा यांच्यावतीने सनातन धर्माच्या मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुरस्कार लाभलेले व्याख्याते आहेत.
Post a Comment