पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या अन्याकारक व जाचक मालमत्ता कराविरोधात आज खांदा कॉलनी येथे महाधरणे आंदोलन
पनवेल- पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समिती आणि महाविकास आघाडी पनवेल- उरण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र यांच्यावर पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या जाचक आणि अन्यायकारक खांदा कॉलनी येथे मालमत्ता कराविरोधात महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
गुरुवार दिनांक ७ मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत खांदा कॉलनीतील किया शोरूम, सिग्नल शेजारी येथे या महाधरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पनवेल महापालिकेच्या स्थापनेला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. गावांमध्ये सेवा,सुविधा पुरवण्याचे फक्त आश्वासन दिले जाते,मात्र अद्याप पाणी त्याचबरोबर सांडपाण्याची विल्हेवाट,रस्ते, गटारे या सुविधा मिळालेल्या नाहीत.लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने आता नाहीतर कधीच नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
ग्रामस्थांच्या काही मागण्या आहेत, त्यामध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट केलेल्या 23 ग्रामपंचायती व नगरपालिका क्षेत्रातील सहा गावांचा पहिल्या पाच वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर व इतर कर माफ करणे,पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर समाविष्ट असलेल्या 23 ग्रामपंचायती व नगरपालिका क्षेत्रातील सहा गावांचा सहा वर्षांचा पासूनचा मालमत्ता कर व इतर कर हे सन 2016 पूर्वी ग्रामपंचायतीच्या कराच्या दराने कायमस्वरूपी आकारण्यात यावे, शहरी भागातील नागरिकांवर लादलेला जाचक मालमत्ता कराचा दर कमी करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या आहेत.
Post a Comment