पत्नी आणि मुलगा झाला बेपत्ता; पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
पनवेल (वार्ताहर): घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेलेली पत्नी आणि मुलगी ही घरी परत न आल्याने ते हरवले असल्याची तक्रार अरुबबुल मॉडल यांनी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात केली आहे.कोन गाव येथे राहणारी एस्मोतारा अरुबबुल मोंडल (२५) आणि मुलगी रायमा खातून (६) हिला घेऊन घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेली. एस्मोतारा ही अंगाने सडपातळ, रंग निमगोरा, उंची पाच फूट तीन इंच आहे. तिच्या चेहऱ्यावर डाव्या गालावर तीळ आहे. रायमा खातून ही सडपातळ, रंग सावळा, उंची साडेतीन सेंटीमीटर व केस बॉबकट आहेत. या दोघींबाबत कोणाला काही माहिती असल्यास तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार संजय दोरगे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment