महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धेत पनवेलमधील सार्थक पोतदारला कास्यपदक
पनवेल- नुकत्याच मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धेत कॅडेट,ज्युनिअर, सिनिअर या गटातून पनवेल,रायगडमधून 3 खेळाडूंची निवड झाली,त्यातून पनवेलमधील गुरु अकॅडमी येथे प्रशिक्षण घेणाऱ्या चि. सार्थक अतुल पोतदार याला ५७ किलो वजन गटात कास्यपदक मिळाले.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रमधील सर्व जिल्ह्यातील कराटे खेळाडूंनी सहभाग दर्शवीला होता.ही स्पर्धा शहाजी राजे क्रीडा संकुल,अंधेरी येथे संपन्न झाली.या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती भाजपाचे आमदार आशिषजी शेलार आणि साऊथ एशियन कराटे संघटनेचे अध्यक्ष हांशी भरत शर्मा होते.या स्पर्धा कराटे- दो अससोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष शिहान सल्लाउद्दीन अन्सारी व सचिव शिहान संदीप गाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.विजयी खेळाडूंना पनवेलमधील शिहान अतुल पोतदार यांचे मार्गदर्शन लाभले होते.
Post a Comment