News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल येथे आज जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन.. जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी रायगड जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद

पनवेल येथे आज जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन.. जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी रायगड जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद

रायगड - (जिमाका):-उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत यांच्या अध्यक्षेतेखाली व जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग,ठाणे श्रीमती विजु सिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्राचे, महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि.07 मार्च 2024 रोजी सकाळी 10:00 ते सायं. 6:00 या वेळेत विरुपाक्ष मंगल कार्यालय,पनवेल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे,महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी दिली आहे.

उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणुकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्हयांना विकासाचा केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे.तसेच राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर पर्यत पोहचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे.त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद 2023 यांनी सुचविलेल्या सुधारणाचे अंमलबजावणीसाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या आहे.त्याच धर्तीवर निर्यात व विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करुन जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी रायगड जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment