News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नव्या मुंबईतील शांता खोत यांना डॉ.नरेंद्र दाभोलकर कार्य गौरव पुरस्कार जाहीर,महिला दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेल येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार

नव्या मुंबईतील शांता खोत यांना डॉ.नरेंद्र दाभोलकर कार्य गौरव पुरस्कार जाहीर,महिला दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेल येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार

पनवेल- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेलतर्फे महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने जेंडर फेअरचे आयोजन करण्यात आले आहे.आजही समाज जेंडरच्या चौकटीत अडकलेला आहे.सहज शक्य असूनही' हे आपलं काम नाही'म्हणून अनेक गरजेच्या गोष्टी केल्या जात नाहीत.जेंडरमुळे समाजात जशी विषमता दिसते तशीच आपल्या रोजच्या जगण्यावरही मर्यादा पडते.या जेंडरच्या चौकटीतून सर्वांनीच बाहेर पडावं म्हणून जेंडर फेअरचं आयोजन केलं आहे.यात वेगवेगळे स्टॉल लागलेले असतील.त्या स्टॉलवर प्रत्यक्ष काही कृती करून त्यांचा अनुभव घेता येईल.ही जत्रा दु. ४ ते ६ या वेळेत असणार आहे. 

तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी दरवर्षी देण्यात येणारा 'डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्य गौरव पुरस्कार ' यावर्षी नवी मुंबईतील शांता खोत यांना प्रदान करण्यात येणार आहे.हा पुरस्कार दिपाली वंदना (सामाजिक कार्यकर्त्यां, संस्थापक - उर्जा ट्रस्ट, मुंबई) यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी त्यांचे व्याख्यान ऐकण्याची संधी पनवेलकरांना मिळणार आहे. हा कार्यक्रम सायं.६ वा.असणार आहे.

हे दोन्ही कार्यक्रम दिनांक १० मार्च २०२४ रोजी पनवेल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे होणार आहेत.हे कार्यक्रम सर्वांसाठी खुले असून जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क : तनुश्री ९२२४७६००५६, पूजा ७७६९०७४५१७, प्रियांका ८६५२६१७३८२

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment