पनवेल महानगरपालिकेत तीन उपायुक्तांच्या नियुक्त्या.... संतोष वारुळे,मारुती गायकवाड आणि बाळासाहेब राजळे या उपायुक्तांचा समावेश
पनवेल दि.२८(वार्ताहर): पनवेल:केंद्रीय निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख आणि उपायुक्त असलेले सचिन पवार आणि गणेश शेटे यांच्या बदल्या झाल्या होत्या.यांनतर रिक्त झालेल्या जागांसाठी तीन उपायुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
या नियुक्त्यामध्ये संतोष वारुळे,मारुती गायकवाड आणि बाळासाहेब राजळे या उपायुक्ताचा समावेश आहे. अचानक रिक्त झालेल्या जागांवर नियुक्त्या करण्यास शासनाने तत्परता दाखविली नसल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पावसाळी कामे तसेच मार्च एंडिंग सारखी मालमत्ता वसुलीच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अद्यापही पालिकेची 11 सहाय्यक आयुक्त पदे रिक्त आहेत.नुकतीच 377 जागांसाठी झालेल्या नोकर भरतीच्या सर्व जागा भरल्या गेले नसल्याने पालिकेचे कामकाजावर परिणाम होत आहे .आयुक्त पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु असल्याने आयुक्तांची नियुक्ती लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे.
Post a Comment