लोकसभा व सणासुदीच्या निमित्ताने केलेल्या नाकाबंदी विशेष कारवाईत मोटारसायकल चालकांकडून हजारो रुपयांचा दंड वसूल
पनवेल ( संजय कदम ) : लोकसभा व सणासुदीच्या निमित्ताने पनवेल शहर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी स्पेशल कारवाईत मोटारसायकल स्वारांकडून एकूण 21,900 /- रुपये दंड वसूली करण्यात आली आहे .
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्यासह पोलिसांची पथके व वाहतूक शाखेचे पथक आदींची वडाळे तलाव या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती, सदर नाकाबंदी दरम्यान पोलीस अंमलदार संतोष कोळंबेकर यांनी वडाळे तलाव परिसरातील नंबर प्लेट नसलेले, मुळ सायलेन्सरमध्ये बदल केलेले, वाहन चालवण्याचा परवाना नसलेले, धोकादायक रीतीने वाहन चालवणारे,या दुचाकी वाहनांना पोलीस ठाणे येथे आणून मोटर कायदा कलम प्रमाणे कारवाई करून एकूण 21,900 /- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सदर कारवाई मध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंबादास कांबळे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धारेराव, पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे , पोलीस नाईक किरण सोनवणे आदी उपस्थितीत होते .
Post a Comment