फेसबुकवरील शेअर मार्केटच्या जाहिरातीला भुलून ४६ लाख ६० हजार रुपये गमावले ... पनवेल येथे राहणाऱ्या ५१ वर्षीय व्यक्तीसोबत प्रकार
पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : फेसबुकवरील शेअर मार्केटच्या जाहिरातीला भुलून व्यक्तीने ४६ लाख ६० हजार रुपये गमावल्याची घटना समोर आली आहे.पनवेल येथे राहणाऱ्या ५१ वर्षीय व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर इसमाला फेसबुकवर शेअर मार्केटसंदर्भातील जाहिरात दिसली होती.या जाहिरातीला त्यांनी प्रतिसाद दिला असता त्यांना ग्रुपमध्ये घेण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांना नफ्याचे आमिष दाखवून आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी तब्बल ४६ लाख ६० हजार रुपये पाठवले होते.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment