तूरडाळीचा भुसा भरलेल्या गोणी रस्त्यावर ; पळस्पे- जेएनपीटी मार्गावरील घटना ... वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी केली दूर
पनवेल दि २४, ( संजय कदम ) : तूरडाळीचा भुसा भरलेल्या गोणी रस्त्यावर पडल्याची घटना पनवेल जवळील पळस्पे बाजू कडून जेएनपीटी बाजूकडे जाणाऱ्या ट्रकमुळे घडली असून यावेळी झालेली वाहतूक कोंडी वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे दूर झाली आहे.
पळस्पे बाजू कडून जेएनपीटी बाजूकडे जाणारा ट्रक क्रमांक आर. जे ११ - जे.बी. ८१८२ यामध्ये तुरडाळीचा भुसा भरलेल्या गोण्या होत्या त्यातील काही गोण्या रस्त्यावर पडल्याने काही काळासाठी या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. याबाबतची माहिती वाहतूक शाखेला मिळताच पोलीस हवालदार भोईर, पोलीस नाईक पाटील, पोलीस नाईक ढेंबरे, पोलीस शिपाई भोरे, पोलीस शिपाई घोडे आदींचे पथक घटनास्थळी त्वरित पोहचले व त्यांनी सदर चा ट्र्क तसेच रस्त्यावर पडलेल्या गोण्या एका बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
Post a Comment