News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलमध्ये शनिवारी 'नमो चषक' महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा ..... लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर,आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी,आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती

पनवेलमध्ये शनिवारी 'नमो चषक' महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा ..... लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर,आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी,आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती

पनवेल (प्रतिनिधी) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात 'नमो चषक' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा मतदार संघात पार पडलेल्या नमो चषक २०२४ स्पर्धत ०१ लाख १३हजार २७८ स्पर्धकांनी सहभाग घेऊन महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकाविला आहे.या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक ०२ मार्च रोजी दुपारी ०३ वाजता पनवेल मधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी,आमदार निरंजन डावखरे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर,भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत,शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील,कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यास क्रीडापटू व क्रीडा रसिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन माजी सभागृहनेते परेश ठाकूर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा सरचिटणीस अभिषेक भोपी, दिनेश खानावकर,तालुकाध्यक्ष आनंद ढवळे,शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, कामोठे अध्यक्ष तेजस जाधव, खारघर अध्यख नितेश पाटील, कळंबोली अध्यक्ष गौरव नाईक यांनी केले आहे. 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment