शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद मेळाव्यासाठी सोमवारी पनवेलमध्ये ...तळोजा येथे शिवसेना नेते बबन पाटील यांच्या बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार
पनवेल-शिवसेना पक्षप्रमुख,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार दि.४ मार्च२०२४ रोजी जनसंवाद मेळाव्यासाठी पनवेलमध्ये येत आहेत.
पनवेल शहरातील ठाणा नाका, गार्डन हॉटेल जवळ येथे शिवसेनेच्या पनवेल मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन व जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या जनसंवाद मेळाव्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
त्याचप्रमाणे शिवसेना नेते बबन पाटील यांच्या कमलगौरी पाटील शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तळोजा येथे दुपारी दोन वाजता होणार आहे.
Post a Comment