पनवेल तालुक्यातील आदिवासी कुटुंबास मिळाली तहसिलदार विजय पाटील यांच्या आदेशान्वये हक्काची जमीन
पनवेल - पनवेलचे तहसिलदार विजय पाटील यांच्या आदेशान्वये पनवेल तालुक्यातील आदिवासी कुटुंबास मिळाली हक्काची जमीन मिळाली आहे.याकामी आदिवासीसेवक नामदेव ठाकूर,रायगडभूषण दत्ता गोंधळी,सामाजिक कार्यकर्ते सुनील जोशी,मनीष कातकरी,रत्नाकर घरत यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.
पनवेल तालुक्यातील मौजे धोदाणी येथील सर्व्हे नंबर 2/5 ही 61 गुंठे जमीन आदिवासी खातेदार जोमा काणू घुते यांचे नावे सातबारा सदरी होती. शासनाची कोणतीही परवानगी न घेता सन 2013 पासून बिगर आदिवासी खातेदार दीपक किशनचंद ददलानी यांनी सदरहू जमिनीवर कब्जा केला होता.उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संबंधित विभागांना पत्र व्यवहार केला गेला.मंडळ अधिकारी अजित पवार व श्री.कचरे तलाठी,श्रीनिवास कोतवाल पद्माकर यांनी स्थळ पाहणी केली त्यामध्ये दीपक ददलानी यांनी सदरहू आदिवासी जमिनीवर कब्जा केल्याचे निष्पन्न झाले. तहसीलदार विजय पाटील यांनी सदरहू जागेचा ताबा कब्जा तातडीने आदिवासी खातेदारांना देण्याचे आदेश दिले.
दिनांक 02/02/2024 रोजी तहसीलदार यांनी महसूल अधिकार्यांना पाठवून सदरहू जमिनीचा ताबा प्रत्यक्ष आदिवासी कुटुंबास सुपूर्द केला. आदिवासी कुटुंबातील महिलांनी आनंद व्यक्त केला आणि ताबडतोब जमिनीची मशागत सुरू केली. तहसीलदार विजय पाटील आणि टीम यांनी केलेल्या कामगिरीचे पनवेल तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. ही जमीन परत मिळवून देण्यासाठी कोंकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उप जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी त्यांच्यास्तरावर सहकार्य केले. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस उपायुक्त पंकज डहाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल ग्रामीण अनिल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल शहर श्री. ठाकरे, पोलीस निरीक्षक पनवेल ग्रामीण श्री. शेलकर यांनी वेळोवेळी सहकार्य केले. कायदे तज्ञ अॅड. सिध्दार्थ इंगळे, अॅड.प्रकाश कदम, अॅड.अक्षय गवळी आणि टीमने कायदेशीर बाजू सांभाळली.उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,सरचिटणीस संतोष पवार आणि सर्व सदस्य यांच्यामुळे हे यश मिळाल्याचे उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र मढवी यांनी सांगितले.
Post a Comment