पनवेल ः शासनाच्या माध्यमातून अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक साडी भेट म्हणून दिली जाणार आहे.पनवेल तालुक्यातील 6 हजार 663 अंत्योदय शिधापत्रिकांवर ही साडी स्वस्त धान्य दुकानात दिली जाणार आहे.या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
स्वस्त धान्य दुकानांमध्ये अन्न धान्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे.राज्य शासनाच्या वस्त्र उद्योग विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला.अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना 2023 ते 2028 या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली.पनवेल तालुक्यात 6 हजार 712 अंत्योदय कार्ड धारक आहेत. यापैकी 6 हजार 663 अंत्योदय कार्डधारकांना साडी मिळणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकांच्या यादीनुसार तालुक्यातील रास्त भाव दुकानांच्या नावानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या तालुका स्तरावरील गोदामात साड्यांचे गठ्ठे पोहोचवण्यात येणार आहेत.या योजनेअंतर्गत दिल्या जाणार्या साडीचे वितरण एका विशिष्ट सणाच्या दिवशी केले जाणार आहे.
पनवेल तालुक्यातील 6 हजार 663 अंत्योदय शिधा पत्रिका धारकांना साडी मिळणार आहे.
-प्रदिप कांबळे,
पुरवठा अधिकारी,पनवेल
Post a Comment