News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

दोन कैद्यांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी; तळोजा कारागृहातील प्रकार

दोन कैद्यांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी; तळोजा कारागृहातील प्रकार

पनवेल ( वार्ताहर ) :  तळोजा कारागृहात बंदिस्त असलेल्या दोन कैद्यांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची घटना घडली.या हाणामारीत एका कैद्याच्या जबड्याला दुखापत झाली, तर दुसऱ्याचा दात पडून तो जखमी झाला.या दोन्ही कैद्यांनी आपसात मारामारी करून कारागृहाची शांतता भंग केल्याने तसेच एकमेकांना दुखापत केल्याने या दोन्ही कैद्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.
 
तळोजा कारागृहातील हाणामारीत जखमी झालेल्या कैद्यांमध्ये अजिंक्य अनंत शिंदे ऊर्फ अवी (३२) व किसन विजय भोसले (३०) या दोघांचा समावेश आहे.या दोन्ही कैद्यांना कारागृहातील बॅरेक नंबर-७ मध्ये ठेवण्यात आले होते.किरकोळ कारणावरून या दोघांमध्ये वादावादी होऊन शिवीगाळ झाली.या वादाचे पर्यवसान भांडणात झाल्यानंतर किसन भोसले याने अजिंक्य शिंदे याला पाण्याचे प्लास्टिकचे बकेट तोंडावर मारले.त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर किरकोळ जखम झाली.दरम्यान, त्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली.यावेळी तुरुंग अधिकाऱ्यांनी या बॅरेकमध्ये धाव घेऊन दोघांचे भांडण सोडवले.त्यानंतर तुरुंग अधिकाऱ्यांनी अजिंक्य व किसन या दोघांना एकमेकांपासून दूर बसवले.मात्र यानंतर देखील अजिंक्य शिंदे याने तुरुंग अधिकाऱ्यांच्या पाठीमागून पळत जाऊन किसन भोसलेला मारहाण केली.या मारहाणीत किसन भोसलेचा वरचा दात पडून तो जखमी झाला.त्यानंतर तुरुंग अधिकाऱ्यांनी दोघांना पकडून तुरुंगातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्यावर उपचार केले.त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव दोघांची वेगवेगळ्या बॅरेकमध्ये रवानगी केली.त्यानंतर या दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment