अत्रे कट्ट्यावर चला जगूया आनंदे व्याख्यानाचे नवीन पनवेल येथे आयोजन
पनवेल- दशकपूर्ती वर्षानिमित्त नवीन पनवेलच्या आचार्य अत्रे कट्ट्यावर माजी मुख्याध्यापिका,सुप्रसिद्ध लेखिका मंगला कुलकर्णी यांचे चला जगूया आनंदे या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरच्या व्याख्यानाचे रविवार २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नवीन पनवेलच्या सिडको उद्यान,अरुणोदय हॉस्पिटल समोर येथे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अत्रे कट्ट्याचे अरविंद करपे यांनी केले आहे.
Post a Comment