पनवेल शहरातील केकच्या दुकानाला आग ... शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
पनवेल (वार्ताहर): पनवेल शहरातील एमटीएनएल रोडवर असलेल्या एका केकच्या दुकानाला आज सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे.केकचे दुकान बंद असताना ही आग लागली असल्याने शाॅर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज बांधला जात आहे.या आगीत वित्तीय हानी झाली आहे. दुकानातून धूर येऊ लागल्याने हा प्रकार निदर्शनास आला.आगीची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली.
Post a Comment