News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात भव्य दिव्य राष्ट्रीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ....श्रीमद्भागवत महापुराण कथा वाचन तसेच राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशन... दररोज १ लाख भाविकांची उपस्थिती ...४ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान हरिनाम सप्ताह

खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात भव्य दिव्य राष्ट्रीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ....श्रीमद्भागवत महापुराण कथा वाचन तसेच राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशन... दररोज १ लाख भाविकांची उपस्थिती ...४ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान हरिनाम सप्ताह

पनवेल- संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रायगड,ठाणे,नवी मुंबई वारकरी संप्रदायाच्यावतीने खारघरच्या सेंट्रल मैदानात भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.खरघरच्या सेंट्रल पार्क मैदानात भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला असून यात श्रीमद्भागवत महापुराण कथा वाचन तसेच राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशन देखील संपन्न होणार असल्याची माहिती रविवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत देण्यात आली.यावेळी मुख्य निमंत्रक हभप धनाजी महाराज पाटील,माजी आमदार बाळाराम पाटील,शिवसेनेचे प्रमुख प्रवक्ते बबन पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील,काँग्रेस पनवेल शहर जिल्हा कमिटी चे अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या समवेत प्रमुख आयोजकांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना कार्यक्रमाचे बाबत अवगत केले.

हभप संतोष केणे यांनी पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर संपन्न होणाऱ्या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाची माहिती देण्यात आली.४ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान हा हरिनाम सप्ताह भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न होणार असून रोज १ लाख भाविक या सोहळ्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.सेंट्रल पार्क मैदानावरती ३००० तंबू उभारलेले असून त्यामध्ये बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या निवासाची सोय करण्यात आलेली आहे.५००० टाळकरी,३००० पखवाज वादक तर ५००० ज्ञानेश्वरी वाचक रोज याठिकाणी असणार आहेत. सेंट्रल पार्क येथील कार्यक्रम स्थळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 
भाविकांना सोहळ्याचा आनंद घेता यावा व त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आरामशीर बैठक व्यवस्था,मुबलक वाहन पार्किंगची सोय,मुबलक पिण्याचे पाणी,सार्वजनिक शौचालये,प्रथमोपचार अशी जय्यत तयारी आयोजकांनी केलेली आहे.विशेष म्हणजे भाविकांना संत दर्शन व्हावे या उद्देशाने परमाद्य परमधर्माधीश उत्तरामनाय ज्योतिष्पीठाधिश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती, अनंतश्री विभूषित द्वारका शारदा पीठाधीश जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती, जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चल आनंद सरस्वतीजी,गोवर्धन पीठ,पुरी,ओडिषा,जगद्गुरु शंकराचार्य मलकपिठाधीश स्वामी श्री.राजेंद्र दासजी महाराज या प्रभूतींचे आगमन होणार आहे.
 
हभप धनाजी महाराज, हभप मोहन म्हात्रे, हभप संतोष केणे, हभप हनुमान महाराज, हभप नरहरी महाराज,हभप पद्माकर महाराज, हभप संजीव घरत, हभप गोरखनाथ घाडगे,माजी आमदार बाळाराम पाटील,शिवसेनेचे प्रमुख प्रवक्ते बबन पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, काँग्रेस पनवेल शहर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या समवेत प्रमुख आयोजकांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना कार्यक्रमाचे बाबत अवगत केले.
      
सकाळच्या सत्रातले किर्तनकार ....
४ फेब्रु. हभप जयेश महाराज भाग्यवंत. भिवंडी
५ फेब्रु. हभप श्रीराम महाराज पारधी, भिवंडी
६ फेब्रु.हभप सच्चिदानंद महाराज कांबेकर कांबे, रसायनिक
७ फेब्रु. हभप प्रकाश महाराज बोधळे,पंढरपूर
८ फेब्रु. हभप जगन्नाथ महाराज पाटील, भिवंडी
९ फेब्रु. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर, विदर्भ
१० फेब्रु. हभप संजय नाना महाराज धोंडगे नाशिक.
११ फेब्रु. हभप प्रकाश महाराज जवंजाळ, पंढरपूर


संध्याकाळच्या सदरातील किर्तनकार.....
४ फेब्रुवारी हभप संदिपान महाराज शिंदे,अध्यक्ष,वारकरी शिक्षण संस्था आळंदी.
५ फेब्रुवारी हभप पांडुरंग महाराज घुले श्री क्षेत्र देहुं आळंदी
६ फेब्रुवारी हभप चिदंबरेश्वर महाराज साखरे आळंदी
८ फेब्रुवारी महंत हभप श्री नामदेव महाराज शास्त्री भगवानगड
९ फेब्रुवारी हभप केशव महाराज नामदास,
 संत नामदेव महाराज यांचे वंशज
१० फेब्रुवारी हभप भरत महाराज पाटील जळगाव
११ फेब्रुवारी चंद्रशेखर महाराज देगलूरकर, पंढरपूर
१२ फेब्रुवारी काल्याचे किर्तन हभप बंडातात्या महाराज कराडकर..अध्यक्ष, व्यसनमुक्ती संघटना महाराष्ट्र


खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावरती संपन्न होणाऱ्या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान परमपूज्य श्री गुरु आचार्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर (क्षेत्र पंढरपूर) यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथा वाचन होणार आहे.भाविकांनी या कथा वाचनाचा आवर्जून लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांच्यावतीने करण्यात आलेली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment