एअर इंडियामध्ये कामाला लावण्याच्या नावाखाली ३ लाख ४३ हजारांची फसवणूक : दोघांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
पनवेल : एअर इंडिया मध्ये नोकरीला लावतो असे सांगून वेगवेगळ्या कारणांसाठी ३ लाख ४३ हजार ४८३ रुपये घेऊन ते परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.तुषार गणेश शिंदे हे कामोठे, सेक्टर ७ येथे राहत ते नोकरीच्या शोधात होते,. त्यादरम्यान ऑनलाइन एअर इंडियाच्या वेबसाईटवर नोकरीसाठी अप्लाय केले. समोरून त्यांना फोन आला व एअर इंडिया मधून बोलत असेल तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे. त्यांनी माहिती दिली. व्हाट्सअप द्वारे व्हिडिओ कॉल वरून इंटरव्यू गेला. त्यानंतर पुन्हा एका महिलेचा फोन आला व वेबसाईटवर नाव आले की कॉल करा असे सांगितले. दोन दिवसांनी शॉर्टलिस्ट वर नाव आले. त्यामुळे तुषार यांनी तनिषाला फोन केला, यावेळी काही दिवसांनी एअर इंडिया नोकरी लागल्याचे पत्र आले. मुंबईत ट्रेनिंग होणार असून त्यासाठी २८ हजार ७८८ रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्याने पैसे भरले. त्यानंतर तनिषाने फोन करून केबिन चार्जेस व इतर चार्जेस ३५ हजार रुपये भरण्यास सांगितले ते त्यांनी कॅनरा बँकेत भरले,पुन्हा तनिषा यांनी एलआयसीचे ३८ हजार ७२८ रुपये भरण्यास सांगितले ते बँक खात्यात भरले.त्यानंतर एग्रीमेंट चार्जेस, अकाउंट चार्जेस असे एकूण दीड लाख रुपये भरण्यास सांगितले. ते पैसे भरले.काही दिवसांनी अकाउंट डिपार्टमेंट मध्ये काम करतो असे सांगून नितीन सिंग यांनी सीजीएसटीचे पैसे भरावे लागतील असे सांगितले. त्याने त्यास नकार दिला, त्यानंतर भरलेले पैसे परत मागितले असता एक रुपया पाठवला, मात्र पैसे परत पाठवले नाहीत. त्यांनी एअर इंडिया मध्ये चौकशी केली असता असे पैसे घेत नसल्याचे सांगितले. यावरून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
Post a Comment