News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रास प्रसिध्द क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची भेट

पनवेल महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रास प्रसिध्द क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची भेट

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेलच्या आदई सर्कल जवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र विकसित केले जात आहे. या प्रशिक्षण केंद्रास आयुक्त श्री.गणेश देशमुख आणि प्रसिध्द आंतरराष्ट्रीय किर्तीचे क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी नुकतीच भेट देऊन कामाचा आढावा घेतला. 

यावेळी शहर अभियंता संजय जगताप,कार्यकारी अभियंता संजय कटेकर,उपअभियंता सुधीर सांळुखे,  बांधकाम विभागातील अभियंता,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. सध्या या प्रशिक्षण केंद्राच्या ग्राऊंडचे व पॅव्हेलियनचे काम प्रगतीपथावरती असून येत्या काही महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल.

 क्रिकेट हा  लहानांपासून ते थोरामोठ्या सर्वांना आवडणारा खेळ आहे.या खेळामध्ये प्राविण्य मिळवायचे असेल तर मुंबईमधील प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घ्यावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्र तसेच नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील किक्रेटपटूंना शास्त्रशुध्द पध्दतीने क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे या हेतून पनवेल महानगरपालिकेने प्रभाग समिती-ब, प्रभाग क्र.१६ मधील भुखंड क्र. २८, सेक्टर ११ नवीन पनवेल (पूर्व) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र (अकॅडमी) विकसीत करण्याचे काम  सुरू आहे. हे प्रशिक्षण केंद्र आंतरराष्ट्रीय किर्तीचे क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या संस्थेस चालविण्यात देण्यात आले आहे. या कामाची अंदाजित रक्कम  ८ कोटी ८४लाख ३०हजार८१० असून हे सुमारे २९.८९९ चौ. मी. (७.४७ एकर) क्षेत्रफळ जागेमध्ये हे प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक वर्षी १० ते १९ वयोगटातील किमान १०० विद्यार्थाना विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.पनवेल शहर व नवी मुंबई , रायगड जिल्ह्यांतील भविष्यातील क्रिकेटपटूसांठी हे  प्रशिक्षण केंद्र अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment