भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात प्रगत ध्वनीशास्त्र आणि व्याकरणावर कार्यशाळा संपन्न
पनवेल- जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाने प्रगत ध्वनीशास्त्र आणि व्याकरण या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती,ज्यामध्ये 80 विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग होता.कौशल्य विकास समितीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश भाषा कौशल्ये वाढवणे हा आहे.
प्रभारी प्राचार्या सानवी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रा.धनश्री योगेश कदम,कौशल्य विकास समितीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात मोलाची भूमिका बजावली.सहायक प्राध्यापक धनश्री कदम यांनी सहभागी,प्राध्यापक आणि पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या उपस्थितीत आनंद व्यक्त केला.
मुख्य वक्ते गौरी पाटील यांनी या कार्यशाळेमध्ये मोलाचे मार्गदर्शन केले.ही कार्यशाळा हा एक मौल्यवान शैक्षणिक प्रवास ठरला,ज्याने ध्वनीशास्त्र आणि व्याकरणातील समृद्ध कौशल्ये आणि ज्ञान वाढवले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ज्यामुळे तो एक संस्मरणीय आणि फायदेशीर अनुभव ठरला.इंग्रजी भाषा काळाची गरज आहे आणि त्यावर प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम विद्यार्थांसाठी मोलाचं ठरला.
Post a Comment