News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलकरांना ८ डिसेंबरपासून १५ जूनपर्यंत करावी लागणार पाण्याची काटकसर; आठवड्यातील १ दिवस पाणी पुरवठा राहणार बंद

पनवेलकरांना ८ डिसेंबरपासून १५ जूनपर्यंत करावी लागणार पाण्याची काटकसर; आठवड्यातील १ दिवस पाणी पुरवठा राहणार बंद

पनवेल : पनवेलकरांना जूनपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करता यावा यासाठी पनवेल महापालिकेने पाण्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे आठवड्यातील एक दिवस जलकुंभाच्या क्षेत्रनिहाय पाणी पुरवठा बंद करुन नियोजन केले जाणार आहे. ८ डिसेंबर ते १५ जूनपर्यंत या दरम्यानचे हे नियोजन असून पालिकेने याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकातून जाहीर केली.त्यामुळे पनवेलकरांना यापुढील सात महिने पाण्याची काटकसर करावी लागणार आहे.गेली अनेक वर्षे पनवेलकरांना पाणीबाणीला सामोरे जात आहेत.


पनवेलचा विस्तार होत असल्याने मागील अनेक वर्षांपासून पनवेलकरांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासते. पूर्वाश्रमीच्या पनवेल नगरपरिषदेचे स्वमालकीचे अप्पासाहेब वेदक जलाशयाची (देहरंग धरण) क्षमता 3.5 दश लक्ष घनमीटर एवढी असल्याने पनवेलकरांची तहान बारमाही भागविण्यासाठी लागणारे मुबलक पाण्याचा उपसा या धरणातून होऊ शकत नसल्याने महापालिका इतर प्राधिकरणांकडून पाणी उसनवारीने घ्यावे लागते.पनवेलकरांना ३२ दश लक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची गरज आहे.देहरंग धरणातून १६ एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) ११ एमएलडी आणि ५ एमएलडी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) पाणी घेऊन पनवेलकरांना पुरवठा केला जातो. एमजेपी आणि एमआयडीसीकडून पनवेलला मिळणाऱ्या पाताळगंगा नदीतून पाणी पुरवठा होत असताना आठवड्याच्या प्रत्येक रविवार व सोमवार या दिवशी कमी पाणी मिळतो तसेच इतर वेळेतही विजेच्या तांत्रिक दरुस्तीची कामांसाठी व इतर दुरुस्तीच्या कामांसाठी शटडाऊन घेतल्याने वारंवार पनवेलला कमी पाणी पुरवठा होत असल्याने देहरंग धरणातून जास्त पाणी उपसा करुन शहराची तहान भागवावी लागते. परंतु अधिकचा उपसा सध्या केल्यास धरणातील पाणीसाठा उन्हाळ्यात संपून जाईल या भितीमुळे महापालिकेने धरणातील पाण्याचे नियोजन ८ डिसेंबरपासून केले असून पनवेल शहरामधील ९ विविध उंच जलकुंभ निहाय एक भाग आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंत्यांनी घेतला आहे.

शुक्रवारी:- मिडलक्लास सोसायटी, भाग एक व दोन, एस. के. बजाज 

शनिवारी:- तक्का गाव, नागरी वसाहतीमध्ये पाणी पुरवठा बंद राहील. 

रविवारी: संपुर्ण नवेलकरांना पाणी पुरवठा सूरळीत सूरु राहील.

सोमवारी:- मार्केटयार्ड, भाजी मार्केट, पायोनिअर सोसायटी, ठाणा नाका, पटेलपार्क, जैन मंदीर, गणपती मंदीर, मामलेदार कचेरी, दत्तराज सोसायटी, साठेगल्ली, विरुपाक्ष मंदीर, धूतपापेश्वर कारखाना शहरातील बहुतांश परिसरात पाणी पुरवठा होणार नाही.

मंगळवारी:- पटेलमोहल्ला 

बुधवारी:- एचओसी कॉलनी परिसर 

गुरुवारी:- ठाणा नाका परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment