News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

दिवसा घरफोडी करणाऱ्या ५ सराईत आरोपींना सीबीडी पोलिसांनी केली अटक : ४ गुन्हयांची केली उकल

दिवसा घरफोडी करणाऱ्या ५ सराईत आरोपींना सीबीडी पोलिसांनी केली अटक : ४ गुन्हयांची केली उकल

पनवेल (संजय कदम): दिवसा घरफोडी करणाऱ्या ५ सराईत आरोपींना सीबीडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या कडून आतापर्यंत ४ गुन्हयांची उकल केली आहे. तसेच जवळपास ९ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.  

सिबीडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या  गुन्हयातील अज्ञात आरोपीनी फिर्यादीच्या घरातून २०६ ग्रॅम वजनाचे सोने व १० हजार रू रोख रक्कम असा एकूण ८ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज दिवसा घरफोडी करून पसार झाले होते. सीबीडी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदरील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना दिवसरात्र अथक परिश्रम घेवून सुमारे २०० च्या वर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत यातील आरोपी निष्पन्न केले व आरोपींचा नाशिक, शिर्डी, सातारा, कोल्हापूर, पुणे व पालघर परिसरात शोध घेवून ते गुजरात राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना गुजरात सीमेवर अच्छाड ता. तलासरी, जि. पालघर येथून अटक केली आहे. नमूद आरोपींना सदरील गुन्हयात अटक करून त्यांचेकडे पोलीस कोठडी दरम्यान कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांनी सीबीडी, खारघर, नेरूळ व मालवणी परिसरात केलेले घरफोडी, ऑटोरिक्षा चोरी व लॅपटॉप चोरीचे एकूण ४ गुन्हे उघडीकस आले आहेत. यामध्ये सददामहुसेन जमालुददीन खान (वय ३५), निलेश राजू लोंढे (वय २२), संजय रत्नेश कांबळे (वय ४२), गुडडू रामधनी सोनी (वय ३९), विक्की राजू लोंढे (वय २०)या आरोपीना पोलिसांनी अटक केले आहे.त्यांच्याविरोधात सिबीडी, खारघर, नेरूळ, मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या कडून पोलिसांनी ८ लाख २२ हजार रुपये किंमतीचे २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे, ३० हजार ररुपये किमतीचा आय फोन ११ प्रो मॅक्स, ५० हजार रुपये किंमतीची काळया पिवळया रंगाची ऑटोरिक्षा तसेच एक १८ इंच लांबी व २.५ इंच व्यास असलेली लोखंडी कटावणी असा मिळून एकूण ९ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यातील आरोपी आरोपी सदद्दामहूसेन जमालुदद्दीन खान याचेवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात १२, आरोपी निलेश राजू लोंढे याचेवर वेगवेगळ्या पोलीस ठाणेत १४, आरोपी संजय रत्नेश कांबळे याचेवर वेगवेगळया पोलीस ठाण्यात ९, आरोपी गुडडू रामधनी सोनी याचेवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ७, आणि आरोपी विक्की राजू लोंढे यांच्यावर १ गुन्हा दाखल आहे. 

ही उल्लेखनिय कामगिरी नवी मुंबई  पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस उपायुक्त परिमंडळ ०१ वाशी विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त तुर्भे विभाग राहूल गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिबीडी पो. ठाणे गिरीधर गोरे, पोलीस निरीक्षक गुन्हे, सिबीडी पो. ठाणे हनीफ मुलाणी यांच्या देखरेखीत सिबीडी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सपोनि सुरेश डांबरे, पोउपनि विष्णू वाघ, पोहवा पाटील, पोहवा पठाण, पोहवा भोकरे, पोना फड, पोना बंडगर, पोना वाघ, पोना साबळे, पोशि पाटील, पोशि पाटील यांनी केली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment