कळंबोली येथे भव्य किर्तन महोत्सव सोहळा
कळंबोली - श्री साईबाबा उत्सवाप्रित्यर्थ कळंबोलीमध्ये भव्य किर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.दि.11 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2023 या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव कळंबोली वसाहतीतील श्री गणेश सहकारी गृहनिर्माण संस्था के.एल.2 टाइप, प्लॉट नं. 2, सेक्टर 5 येथे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि.11 डिसेंबर रोजी रायगडभूषण हभप संकेत महाराज डेरे यांचे किर्तन,मंगळवार दि.12 डिसेंबर रोजी भाषा प्रभू हभप जगन्नाथ महाराज पाटील यांचे किर्तन, बुधवार दि.13 डिसेंबर रोजी झी टॉकीज फेम हभप कबीर महाराज अत्तार यांचे किर्तन,गुरूवार दि.14 डिसेंबर रोजी झी टॉकीज फेम हभप शितलताई साबळे-पाटील यांचे किर्तन, शुक्रवार दि.15 डिसेंबर रोजी झी टॉकीज फेम हभप माउली महाराज काकडे यांचे किर्तन, शनिवार दि.16 डिसेंबर रोजी झी टॉकीज फेम हभप लक्ष्मीप्रसाद महाराज कुळकर्णी यांचे किर्तन,रविवार दि. 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि. 17 डिसेंबर रोजी झी टॉकीज फेम युवा किर्तनकार हभप बाळकृष्ण महाराज डांगे यांचे किर्तन तर सोमवार दि. 18 डिसेंबर रोजी शिवचरित्र व आंतरराष्ट्रीय किर्तनकार, शिवभूषण हभप रोहिदास महाराज हांडे यांचे सकाळी 10 ते 12 या वेळेत काल्याचे किर्तनाचेे आयोजन करण्यात आले आहे.या भव्य किर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन आत्माराम पाटील यांनी केले असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महादेव पाटील उपस्थित राहणार आहेत.
Post a Comment