शरद पवार शनिवारी कळंबोलीमध्ये : पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता स्वाभिमान मेळावा
पनवेल - पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कळंबोली येथे होत असलेल्या कार्यकर्ता स्वाभिमान मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.
शनिवार १६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कळंबोली येथील शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर हा मेळावा होणार आहे.या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी नगरसेवक सतीश मोहन पाटील यांनी केले आहे.
Post a Comment