तीन बांगलादेशीय पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात
पनवेल : पनवेल बस आगाराच्या परिसरात तीन बांगलादेशी नागरिकांना पनवेल शहर पोलिसांनी चार दिवसांपूर्वी ताब्यात घेतले आहे. या तिघांची नावे अली हाफीज शेख, रबीवुल मनन शेख, मेसन किसलू मुल्ला अशी आहेत.हे तिघेही काही महिन्यांपासून नवी मुंबईतील दारावे गावात राहत होते.
या तिघांनीही बांगलादेश आणि भारत सीमेवरून घुसखोरी केली आहे. तसेच ते विनापारपत्र नवी मुंबईत राहत होते. बांगलादेशातील नोडाईल जिल्ह्यातील जामवीर पडोली या गावातील हे तिघेही मूळ रहिवासी आहेत. व पनवेल एस टी स्टॅन्ड परिसरात वावरत असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना पोलिसांनी त्यांना गुप्तबातमीद्वारा मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार , पो. उप. नि. अभयसिंह शिंदे, पोहवा वाघमारे, पोहवा परेश म्हात्रे,पोहवा गंथडे,पोना पारधी, पोना राठोड, पोशी दाहीजे ,पोशी कांबळे ,पोशी मोकल आदींच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना लवकरच कायदेशीर कार्यवाहीनंतर त्यांच्या मूळ गावी पाठविणार आहेत.
Post a Comment