News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखासाठा हस्तगत : अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई

पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखासाठा हस्तगत : अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई

पनवेल (संजय कदम): पनवेल एसटी स्टॅन्ड व रेल्वे स्टेशन परिसरातील बेकायदा टपऱ्यांवर अन्न सुरक्षा विभागाने धडक कारवाई करीत मोठ्या प्रमाणात गुटखासाठा हस्तगत केला.या कारवाईमुळे बेकायदा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पनवेल एसटी स्टॅन्ड परिसर व रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या बेकायदा टपऱ्यांवर महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी असलेल्या विविध प्रकारचे गुटखे, पान मसाला, सुगंधित तंबाखू याची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी अन्न सुरक्षा विभागाला करताच अन्न सुरक्षा अधिकारी विक्रम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या पथकाने या भागात छापे टाकून बेकायदे विक्री करणारे पप्पू प्रजापती(वय ५०), प्रीसु गुप्ता(वय २४), शिव पूजन पटेल(वय २२), सुभाष गुप्ता(वय ४०), शिवबाकु चौरसिया(वय  ३७) व सतीश देवाडिगा(वय ४१) यांच्या पान टपऱ्यांवर छापे टाकून जवळपास ५९८२८ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यांच्या विरोधात भादवि कलम १८८, २७२, २७३,३२८.३४ सह प्रतिबंधित अन्नपदार्थाचे वितरक व पुरवठादार यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमने २०११ चे कलम 26 (1). 26 (2)(11), कलम 26 ( 2 ) (iv) तसेच कलम 27 (3) (d ) 27 (3) (e) सहवाचन कलम 30 (2) (a) सहयाचन मा अन्न सुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य अधिसुचना कमांक असुमाअ./अधिसुचना-४९६/७ दिनांक १८/०७/२०२३ शिक्षा कलम ५९  अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
फोटो: गुटखा(प्रतिकात्म) ...

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment