नवीन पनवेलच्या अत्रे कट्ट्यातर्फे रविवारी मंगला खाडिलकर यांचा आठवणींच्या साठवणी कार्यक्रम
पनवेल- नवीन पनवेलच्या आचार्य अत्रे कट्ट्यातर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर यांचा आठवणींच्या साठवणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आठवणींचे हिंदोळे हे अखंड उर्जेचा उगम असतात,या आणि अशाच आठवणी मंगला खाडीलकर आपल्या कार्यक्रमातून सादर करणार आहेत.रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नवीन पनवेलच्या सिडको उद्यान, सेक्टर ११ अरुणोदय हॉस्पिटल समोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे अत्रे कट्ट्याचे प्रमुख संयोजक अरविंद करपे यांनी सांगितले.
Post a Comment