आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक : नवीन पनवेलमधील घटना
पनवेल : नवीन पनवेलमधील एका ज्येष्ठ नागरिकाचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एक लाख २८ हजारांना लुबाडल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने खांदेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सायबर चोरांविरोधात आयटी अॅक्टसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.नवीन पनवेल भागात राहणारा ज्येष्ठ नागरिक एका कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. ५ ऑक्टोबर रोजी एका महिलेने या ज्येष्ठ नागरिकाच्या व्हॉट्स अॅपवर मेसेज पाठवून त्यांच्यासोबत ओळख वाढवली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकासोबत अश्लील गप्पा करताना व्हिडीओ कॉल करण्यास सुरुवात केली होती.दोघांमधील या संभाषणादरम्यान महिलेने ज्येष्ठ नागरिकाला नग्न होण्यास भाग पाडले तसेच हा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली होती.यावेळी ज्येष्ठ नागरिकाने ऑनलाईन ६३ हजार रुपये पाठवून दिल्यानंतर सायबर टोळीने पुन्हा वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून ६५ हजार रुपये उकळले होते. त्यानंतरही कारणे सांगून पैशांची मागणी होत होती.
Post a Comment