१५० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड : २५० ते ३०० तक्रारदारांना न्याय मिळणार
पनवेल (संजय कदम): जवळपास १०० ते १५० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे, त्यामुळे २५० ते ३०० तक्रारदारांना न्याय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पनवेलजवळील सुकापूर विमलवाडी गट नंबर ७ व ८ येथे ६० रूम बांधणेकरीताचे काम बांधकाम व्यावसायिक शिरीषकुमार रंगराव चव्हाण याने घेतले होते व त्याने सदर ठिकाणी कामाची सुरुवात केली परंतु प्रत्यक्षात सदर ठिकाणी प्रत्येक १ सदनिका ही २ ते ३ लोकांना विकुन सदर व्यक्तींकडून लाखो रुपये त्याने उकळले होते.अश्याप्रकारे त्याने २५० ते ३०० व्यक्तींना जवळपास १५० कोटींचा गंडा घालून तो फरार झाला होता. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात कृष्णा सहदेव मोरे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्स वॉरंटमधील पोलीस अधिकारी पोउपनि अमोल चौगुले, पोहवा युवराज येळे,पोहवा रजनिकांत पगारे, पोना नितीन कुंभार, पोना नंदकुमार आढारी,पोशि राहूल बेलवांडे, पोना प्रवीण मेथे तसेच स्थानिक पोलीस मित्र भरत बाळासो सावंत, प्रशांत रूघे यांच्या सहकार्याने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे सदर आरोपीचा शोध घेत असताना त्याला मा. पनवेल न्यायालयातून २०१६ साली जामीन मिळाल्यापासून त्याने मुंबई व मूळ गावाकडील स्वताची सर्व स्थावर मालमत्ता विकून ८ वर्षे मा. न्यायालयात तारखेस हजर राहिला नव्हता व सध्या तो कोल्हापूर परिसरात राहत असल्याची माहिती या पथकाला मिताचा त्यांनी सापळा रचून त्यानं अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यासह वाशी, कळंबोली ठाण्यात गुन्हा दाखल आहेत.त्याच्या अटकेमुळे या तक्रारदारांना न्याय मिळेल अशी आशा आहे.
Post a Comment