६० कोटींचे दोन रेल्वे उड्डाणपूल उरणकरांच्या सेवेत रुजू : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
रायगड (जिमाका)-- राष्ट्राच्या निर्मितीसाठी योगदान देण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले तरच राष्ट्राचा विकास वेगाने होतो,त्या करीता गतीमान पद्धतीने काम करणे गरजेचे आहे.विद्यमान राज्य सरकार त्या पद्धतीने काम करत असल्यामुळे विकास कामे गतीने होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बाधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यानी केले.
दास्तान ते चिलें (रेल्वे क्रॉसिंग क्र. २) आणि रांजणपाडा (रेल्वे क्रॉसिंग क्र. ३) या ६० कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपूल उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी खा.श्रीरंग बारणे,आमदार महेश बालदी,आ.प्रशांत ठाकूर,उद्योजक जे.एम.म्हात्रे,अभियंता र.रा.हांडे,खाडीपूल विभाग क्र.1 च्या कार्यकारी अभियंता स्वाती पाठक आदी उपस्थित होते.
मंत्री रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले, या भागातील ग्रामस्थांना आता धोकादायक पद्दतीने रेल्वेरुळ पार करण्याची गरज नाही. तो धोका आता दुर झाला आहे.या पूलांकरिता स्थानिक आमदार महेश बालदी यांनी शासनाकडे पाठपुरा केला होता.त्यांच्या माध्यमातून उरणची परिस्थिती सुधारली आहे. त्यांनी सुचवलेली सर्व कामे योजनेतून मार्गी लावली जातील असेही त्यांनी आश्वासित केले.
उरण तालुक्यात मागील काही वर्षापासून सुमारे 60 कोटी रुपये खर्चाच्या या दोन उड्डाणपुलाची ही कामे सुरू होती नुकतीच ही कामे पूर्ण करण्यात आली. या उड्डाणपुलामुळे या भागातील नागरिकांना धोकादायक रेल्वे क्रॉसिंग करावे लागणार नाही तसेच रेल्वे फाटकामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे त्यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.दास्तान उड्डाणपूल हा सव्वा किलोमीटर लांबीचा आहे तर रांजणपाडा उड्डाणपूल एक किलोमीटर लांबीचा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Post a Comment