News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

ग्रीन हाऊस व फॅब्रिकेशनसाठी लागणारे लाखो रुपये किमतीचे पाईप चोरणाऱ्या त्रिकुटाला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

ग्रीन हाऊस व फॅब्रिकेशनसाठी लागणारे लाखो रुपये किमतीचे पाईप चोरणाऱ्या त्रिकुटाला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल (संजय कदम): फॅब्रिकेशनसाठी लागणारे लाखो रुपये किमतीचे पाईप चोरणाऱ्या त्रिकुटाला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्या कडून टाटा कंपनीच्या पिकअप टेम्पो सह अठरा लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. 

तालुकयातील चिखले गावाच्या हद्दीत असलेल्या इक्रा स्टील अँड ट्यूब्स प्रा.लि.कंपनीच्या गोडाऊनमधून जानेवारी २०२३ ते आजपर्यंत अज्ञात आरोपींनी जवळपास २६ लाख ३७ हजार रुपये किमतीचे ग्रीन हाऊस व  फॅब्रिकेशनसाठी वापरण्यात येणारे अठ्ठावीस टन वजनाचे जी. आय. व एम. एस. वेगवेगळ्या आकाराचे व लांबीचे पाईप चोरीस गेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात येताच वपोनि अनिल पाटील व पोनि (गुन्हे)  जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार महेश धुमाळ, पोलीस हवालदार सुनील कुदळे, पोलीस हवालदार विजय देवरे व पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे येथील गोडाऊनचे सुपरवायजर जयकुमार तिवारी (वय ४७) याने त्याचे सहकारी मुकेश पटेल (वय २२),  लालाराम पटेल (वय २३) व अजून दोन आरोपी यांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केल्याने यातील तीन आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या पिकअप टेम्पो सह चोरलेला माल असा मिळून अठरा लाख चौदा हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान दोन फरार आरोपींचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment