डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे 'हिंसा के खिलाफ,मानवता की ओर' अभियान : पनवेलमध्ये पथनाट्य स्पर्धा व राम पूनियानी यांचे व्याख्यान
पनवेल- डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला येत्या २० ऑगस्टला १० वर्षे होत आहेत.या खुनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती 'हिंसा के खिलाफ,मानवता की ओर' हे अभियान राबवित आहे. त्या अंतर्गत १९ ऑगस्टला पनवेलमध्ये पथनाट्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत, लेखक व इतिहास संशोधक राम पूनियानी उपस्थित राहणार आहेत.
पथनाट्य स्पर्धा सकाळी ९.३० ला सुरू होईल. दुपारी ३.३० ला राम पूनियानी यांचे 'प्रोपगंडा' या विषयावर व्याख्यान होईल व त्यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. हा कार्यक्रम महा.अंनिस पनवेल शाखा व इनर्व्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊन यांच्यातर्फे आयोजित केला आहे. ही स्पर्धा व व्याख्यान के. आ. बांठीया विद्यालयाच्या हॉलमध्ये असणार आहे.
याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता डॉ.दाभोलकरांच्या खूनाचा निषेध म्हणून पनवेलमध्ये 'निर्भय रॅली 'काढण्यात येणार आहे. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापासून सुरू होऊन तिथेच समारोप होणार आहे.
या कार्यक्रमास व निर्भय रॅलीस लोकांनी उपस्थित रहावे असे समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क : ९५९४०९४७८५, ९२२४७६००५६
Post a Comment