सरकारला धडकी भरली पाहिजे असं आंदोलन करा - राज ठाकरे...मुंबई-गोवा महामार्गासाठी पनवेलमध्ये निर्धार मेळावा
पनवेल : दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा भाजने पक्ष उभारायला शिकावे' असा टोला राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला पनवेल येथे सुनावला आहे.पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातर्फे आयोजित मुंबई-गोवा महामार्गासाठी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले कि,भारतीय जनता पक्षाने मध्यतंरी सल्ला दिला की मनसेने रस्ते आणि टोल बांधायला पण शिका.त्यांना इतकंच सांगतो की,दुसऱ्यांच्या आमदारांना फोडून आणायच्या ऐवजी स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका आणि पक्ष बांधायला शिका.नको ते सल्ले आम्हाला देऊ नका असा सणसणीत टोला लगावला तसेच लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवायच्या आणि धाकावर लोकांना पक्षात घ्यायचं आणि त्यानंतर ती लोकं गाडीत झोपून जाणार. यानंतर "मी तुला दिसलो का? मी होतो का." म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस नाही का? असा सवाल त्यांनी केला.यावेळी राज ठाकरे यांनी अजित पवार यांचा सुद्धा समाचार घेत सांगितले कि,अजित पवार म्हणे महाराष्ट्राचा विकास करायला सत्तेत गेलो.पंतप्रधानांनी ७०,००० कोटींच्या घोटाळ्याची आठवण करून दिली आणि हे टुणकन निघाले.बहुधा भुजबळांनी सांगितलं असेल जेलमध्ये काय काय असतं. त म्हणाले असतील जेलपेक्षा भाजपकडे गेलेलं बरं असा मिश्किल टोमणा सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी गटाला लगावला तर त्यापुढे जाऊन त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत बोलताना सांगितले कि, मी नितीनजींना विनंती केली होती की तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला तर ते म्हणाले की अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात.हे नेमकं मुंबई गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का? असा प्रश्न विचारत आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५ हजार कोटी रुपये आहे.तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या असल्याचे सांगितले.
शेवटी महाराष्ट्र सैनिकांना आवाहन करताना राज ठाकरे यांनी सांगितले कि,पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा.सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं आंदोलन नको पण आंदोलन असं करा कि सरकारला धडकी भरली पाहिजे असा आवाहन केले.
Post a Comment