दागिने बनवण्यासाठी दिलेली ७० ग्रॅम सोन्याची लगड घेऊन पसार झालेल्या आरोपीस अटक : गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने पश्चिम बंगालमधून घेतले ताब्यात
पनवेल (संजय कदम) : सोन्याचे दागिने बनवण्यासाठी दिलेली ७० ग्रॅम सोन्याची लगड दुकानातून घेऊन पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने पश्चिम बंगाल येथील कोलागड येथून ताब्यात घेतले आहे. मानस भौमिक असे या आरोपीचे नाव आहे.
पनवेल शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात सोन्याचे दागिने बनवण्यासाठी दिलेली ७० ग्रॅम सोन्याची लगड आरोपी मानस भौमिक (वय ३८) हा पसार झाला होता. सदर आरोपीचा ठावठिकाणा मिळत नसल्याने गुन्हा उघडकीस आणण्यास अडथळा येत होता. अखेर पनवेल शहर पोलिसांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून तांत्रिक तपासाद्वारे त्याचे लोकेशन प्राप्त केले. त्यानंतर गुन्हे शाखा कक्ष दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुनील गिरी, पोलीस हवालदार शिंदे, सागर रसाळ आदींचे पथक तत्काळ पश्चिम बंगाल राज्यातील कोलागड या ठिकाणी रवाना झाले.आरोपी मानस भौमिकच्या लोकेशनची माहिती घेऊन कोलागड रेल्वे स्टेशन येथे पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. व त्याला पुढील चौकशीसाठी पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Post a Comment