पनवेलमध्ये हिरो कंपनीचे नवीन कंनसेप्ट 2.0 फँसिलीटी सेंटर सुरु,आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन : आधुनिक तंत्रज्ञान,अद्यावत शोरुम
पनवेल (संजय कदम) : पनवेल व पनवेल परिसरातील ग्राहकांच्या सोयीसाठी हिरो कंपनीने त्यांच्या पनवेलमध्ये नवीन कंनसेप्ट 2.0 फँसिलीटी सेंटर सुरु केले असून या नविन अद्यावत शोरुमचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी नवीन हीरो इलेक्ट्रिक विदा, वि 1 प्रो व एक्स पल्स 200, रैली प्रो या नवीन 2 टू व्हीलरचे देखील लॉन्चिंग करण्यात आले.
या उदघाटनावेळी पनवेल महानगरपालिका माजी सभागृहनेते परेश ठाकूर, हिरो मोटोकॉर्पतर्फे सेल्स झोनल हेड अजित जाचक,सव्हिस झोनल हेड दिनेश खंडेलवाल,कँड झोनल अमित भाटे,मुंबई एरिया मँनेजर उमेश सिंह,भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे,भाजप शहर खजिनदार संजय जैन आणि इतर सर्व अधिकारी तसेच एचएम मोटर्सचे पार्टनर्स मनोज सुचक व सुनील सुचक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात मनोज सुचक यांनी मत प्रकट करताना सांगितले की, पनवेल, नवी मुंबई,कर्जत,खोपोली,उरणमधील सर्व ग्राहकांना नवीन हीरो गाडी खरेदी करताना ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि माहिती दिली जाईल. या कार्यक्रमामध्ये नवीन हीरो इलेक्ट्रिक विदा, वि 1 प्रो व एक्स पल्स 200, रैली प्रो या नवीन 2 टू व्हीलरचे लॉन्चिंग करण्यात आले.यावेळी नवीन 2 मॉडेलबद्दल एचएम मोटर्सचे सीईओ हर्षल सुचक,सिद्धार्थ सुचक आणि जिनल सुचक यांनी सर्व उपस्थितांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले.
Post a Comment