नवी मुंबई विमानतळ ऑगस्ट-२०२४ पर्यंत सुरू होणे अपेक्षित - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पनवेल - नवी मुंबई विमानतळ ऑगस्ट-२०२४ पर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
राज्यातील विमानतळांच्या दुरवस्थेबाबत लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान नवी मुंबई विमानतळाची माहिती देण्यात आली. त्यानंतर पुढील वर्षी नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यापुढे बोलताना ते म्हणाले,हा विमानतळ पुढच्या वर्षी सुरु होतोय. मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही दोघांनी या विमानतळाची पाहणी केली आहे. रणवे सुद्धा तयार झालेला आहे, या पावसाळ्यानंतर त्याचे फायनल कोटिंग पूर्ण होईल. विमानतळाच्या टर्मिनलच्या इमारतीचे काम सुद्धा अतिशय वेगाने चालू आहे,त्यामुळे ऑगस्ट-२०२४ पर्यंत हा विमानतळ सुरू होईल असे त्यांनी सांगितले.
Post a Comment