पनवेल शहर जिल्हा-तालुका काँग्रेस करणार मणिपूरमध्ये स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराविरोधात कळंबोली येथे तीव्र निषेध आंदोलन
पनवेल- पनवेल शहर जिल्हा-तालुका काँग्रेसच्यावतीने मणिपूरमध्ये स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराविरोधात कळंबोली येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड काढण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. त्यानंतर त्यांच्यावर सामूहिक पाशवी बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी म्हणून काँग्रेस पक्षातर्फे निषेध आंदोलन पुकारलेले आहे.सोमवार दि. २४ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.३० के एल टू चौक कळंबोली येथे मणिपूर येथील अमानवीय घटनेच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्यात येणार आहे. या अनुषंगाने पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येंने उपस्थित राहावे ही विनंती
या आंदोलनात ज्येष्ठ नेते,फ्रंटल अध्यक्ष,सेल अध्यक्ष, शहर अध्यक्ष,कार्याध्यक्ष,पदाधिकारी,निवडून आलेले प्रतिनिधी,आघाडी,संघटनांचे नेते,विभाग,सेलचे कार्यकर्ते आणि समर्थक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जयदास पाटील,अध्यक्ष कळंबोली शहर काँग्रेस व जयश्री खटकाले अध्यक्ष,कळंबोली शहर महिला काँग्रेस यांनी केले आहे.
Post a Comment