चोरालाही आवडले राजकीय पक्षाचे कार्यालय ... ३६ हजाराचा इलेक्ट्रॉनिक ऐवज चोरीला
पनवेल : पनवेल शहरातील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात अज्ञात चोरटयांनी चोरी करून आतील इन्व्हर्टरची बॅटरी,एलइडी टीव्ही व संगणकाचा डेकस्टॉप असा मिळून हजारो रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे .
शहरातील काँग्रेस भवन ( नित्यानंद मार्ग) या काँग्रेस पक्षाच्या असलेल्या पक्ष कार्यालयात अज्ञात चोरटयांनी चोरी करून आतील इन्व्हर्टरची बॅटरी ,एलइडी टीव्ही व संगणकाचा डेकस्टॉप असा मिळून जवळपास ३६,०००/- रुपये किमतीचा ऐवज दोन्ही दरवाज्याचे लॉक व कडी कोयंडा तोडून चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Post a Comment