News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

निसर्गाचे संवर्धन करण्यास सिंधुदुर्ग जिल्हा रहिवाशी हितवर्धक संघाचा वृक्षारोपणाद्वारे पुढाकार : प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ

निसर्गाचे संवर्धन करण्यास सिंधुदुर्ग जिल्हा रहिवाशी हितवर्धक संघाचा वृक्षारोपणाद्वारे पुढाकार : प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ

पनवेल-सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे पनवेलच्या रेल्वे स्टेशन रोडवरील नवनाथ मंदिराच्या समोरील भागात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी फक्त वृक्षारोपण न करता त्याची देखभाल संस्थेमार्फत केली जाणार आहे,जेणेकरून निसर्गाचे संवर्धन करण्याच्या कार्यात संस्थेचा सुद्धा हातभार असेल. 

माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्याहस्ते वृक्षारोपण करून उपक्रमास सुरूवात करण्यात आली.पनवेल रेल्वे स्टेशन ते पनवेल एस.टी.स्टॅन्ड पर्यंतच्या रस्ता दुभाजकावर कादंब,कन्हेरे,कांचन,कडुलिंब,बदाम व इतर देशी पर्यावरण पूरक झाडे लावण्याचा उपक्रम संपन्न झाला.मंडळाचे कार्यकारणी सदस्य,कार्यकर्ते तसेच पर्यवरणप्रेमी हितचिंतक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन १०० वृक्षांची लागवड केली.
सदर वृक्षांची देखभाल सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ करणार आहे,मंडळाचे अध्यक्ष केशव राणे,उपाध्यक्ष श्री संतोष चव्हाण,उपाध्यक्ष सौ प्रिया खोबरेकर,सचिव रामचंद्र मोचेमाडकर, खजिनदार दीपक तावडे,सहखजिनदार बाबाजी नेरूरकर आणि सदस्य कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन ही झाडे लावली आहेत.गेल्यावर्षी १०० आणि हया वर्षी १०० अशी दोनशे झाडे लावून मंडळाने निसर्ग संवर्धन कार्य उत्तमरित्या पार पडले आहे.ह्या वृक्षारोपण अभियानाद्वारे निसर्ग संवर्धन तर होतेच शिवाय समाजाप्रती सिंधूदुर्गवासीयांच्या मनात असलेला मायेचा ओलावा तमाम रायगडवासीयांच्या अंतःकरणाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही असे मत ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे नेहमीच चांगले उपक्रम घेतले जातात.गेल्यावर्षी लावलेली झाडे त्यांनी बोलल्याप्रमाणे जतन करून वाढवली आहेत. पर्यावरणाच्या बाबतीत त्यांनी सुरू केलेले उपक्रम पनवेलकरांना नक्कीच अभिमानास्पद आहे.यापुढेही त्यांच्या प्रत्येक उपक्रमात आमचा सहभाग त्यांच्यासोबत नक्कीच असेल
श्री.प्रितम म्हात्रे, 
माजी विरोधी पक्षनेते

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment