गाढेश्वर धरणातील पाण्याच्या प्रवाहात वाहत जाताना अडकल्याने पोलिसांनी दोघांना वाचविले
पनवेल (संजय कदम) - पनवेल तालुक्यातील गाढेश्वर धरणात वाहून जाणाऱ्या दोघांना पनवेल तालुका पोलिसांनी काढले बाहेर पनवेल तालुका पोलिस ठाणे हद्दीतील नेरे बीटमध्ये पोलिस गस्त घालत असताना गाढेश्वर नदीपात्रात सोहेल खावजौद्दिन अहमद शेख व मनोज शंकर गांगुर्डे हे दोघेजण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहत जाऊन पाण्यात अडकल्याचे पोलिसांना दिसले.सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद फडतरे, तुकाराम कोरडे, संदीप पाटील,धनंजय पठारे, कांबळे,जाधव यांनी तत्काळ दोरीच्या साहाय्याने या दोघांना सुखरूप बाहेर काढले तसेच यावेळी पोलिसांनी अतिउत्साह टाळण्याचे आणि सतर्कतेचे आव्हान केले आहे.
Post a Comment