चांद्रयान-३ प्रक्षेपणासाठी रसायनीतून १२० टनाचे इंधन : महाराष्ट्रातून मिळालेल्या साधनसामुग्रीत रसायनीचाही महत्त्वाचा सहभाग
पनवेल - इस्रो अर्थातच भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्थेच्या चांद्रयान-३ प्रक्षेपणासाठी रसायनीतून १२० टनाचे N2O4 प्रॉपेलंट(इंधन) पाठविण्यात आले.या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल खालापूर- पनवेलकरांना निश्चितच अभिमान आहे.
इस्रोचाच भाग असलेल्या रसायनीतील प्रॉपेलंट कॉम्प्लेक्समधून GSLV रॉकेटला लागणारे प्रॉपेलंट (N2O4) ते सुमारे १२० टन पाठवण्यात आले. चांद्रयान-३ प्रक्षेपणासाठी हा एक महत्त्वाचा सहभाग असून यासाठी या प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे.
रसायनीमधील प्रसिद्ध अशी हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल कंपनी ही २०१८ साली इस्त्रोने आपल्याकडे घेतली.पूर्वाश्रमीची हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल कंपनी १९८५ पासून इस्रोच्या अवकाश यान कार्यासाठी लागणारे प्रॉपेलंट देत होती.सतीश धवन स्पेस सेंटर, इस्रोने ही कंपनी आपल्या ताब्यात घेतल्यानंतर तिचे प्रॉपेलंट कॉम्प्लेक्स असे नाव ठेवण्यात आले.
चांद्रयान-३ प्रकल्पासाठी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून साधनसामग्रीची मदत झाली,त्यामध्ये रसायनीमधून गेलेल्या प्रॉपेलंटचा तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे.
Post a Comment