शेतकरी कामगार पक्षाचा पाली येथे ७६ वा वर्धापन दिन सोहळा : निष्ठावंतांचा जागर
पनवेल- शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापनदिन सोहळा २ ऑगस्ट २०२३ रोजी पाली- सुधागड येथे होणार आहे.या वर्धापन दिन मेळाव्यास शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील,कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा भक्तनिवास येथे होणार आहे.
शेतकरी कामगार पक्षाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत .पाली येथे ७६ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे.पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.अलीकडेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते,माजी आमदार विवेक पाटील व पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी पक्षाला रामराम केल्यामुळे या वर्धापन दिन सोहळ्यात त्यांची पोकळी जाणवणार आहे. या वर्धापन दिन सोहळ्यास रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यावेत म्हणून जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय बैठका घेतल्या जात आहेत.
Post a Comment