संतापलेले करंजाडेकर नेणार सिडकोवर जलआक्रोश मोर्चा : धो-धो पावसातही पाणीटंचाई
पनवेल : धो-धो पावसातही पाणीटंचाई भासत असल्याने संतापलेले करंजाडेकर सिडकोवर ३ ऑगस्ट रोजी जलआक्रोश मोर्चा काढणार आहेत.
एकिकडे पावसाळा सुरु झाला असताना दुसरीकडे पनवेलजवळील करंजाडे वसाहतीला तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.करंजाडे वसाहतीत मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने उन्हाळयासारखीच स्थिती झाली आहे.एमजेपीच्या पाणी प्रकल्पावरील पंप नादुरुस्त झाल्याने करंजाडेकरांच्या घशाला कोरड पडत असल्याने कॉलेजफाटा येथील बैठकीमध्ये करंजाडेकरांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी बैठकीला माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, मा. उपसरपंच योगेंद्र कैकाडी,माजी पोलीस अधिकारी सी.टी.पाटील,शिवसेना निखिल भोपी,किरण पवार, पोलीस पाटील कुणाल लोंढे,चंद्रकांत गुजर यांच्यासह नागरिक महिला मोठया प्रमाणात उपस्थित होते.
सिडकोची स्वतःची यंत्रणा नसल्याचे पाण्याकरीता पूर्णपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर अवलंबून राहावै लागत आहे,त्यातुलनेत एमजेपीकडून कमी पाणी दिले जाते,याचे कारण म्हणजे जुनाट झालेल्या जलवाहिन्या होय.त्यांना फुटीचे ग्रहन लागले असल्याने मुबलक जास्त दाबाने पाणी दिले जात नाही.या शिवाय भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र आणि वायाळ येथील पंप नादुरुस्त असल्याने पंपिग बंद पडते. यामुळे एमजेपी सिडकोला पाणीपुरवठा करीत नाही यामुळे गेल्या काही दिवसापासून करंजाडे वसाहतीला पाण्याची टंचाई भासत आहे.एमजेपी आणि सिडको यांच्या घोळात मात्र करंजाडेकरांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
यावेळी पाणी सुरळीत होण्याकारिता करंजाडे महाविकास आघाडीकडून पाठपुरावा सुरु आहे. याबाबत एमजेपी व सिडकोला पत्रव्यवहार देखील केला आहे. मात्र यावर एमजेपी व सिडकोकडून कोणताही उपाययोजना न झाल्याने करंजाडे वसाहतीतील नागरिक पाण्याविनाच असल्याने माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्याकडे नागरिकांनी पाणी पुरवठ्याबाबत तोंडी तक्रारी मांडल्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने करंजाडे वसाहतीतील नागरिकांकडून सिडको विरोधात काढण्यात येणाऱ्या जल आक्रोश मोर्चाचा आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी विरोधात नाराजीचा सुर उमटला.त्याचबरोबर 3 ऑगस्ट रोजी सिडको भवनावर जलआक्रोश मोर्चा काढण्याचे ठरले. यावेळी त्रस्त नागरिक व महिलांनी आपली मत मांडली.
कोणतीही पक्ष, संघटना नाही
"फक्त नागरिक" म्हणून निघणार मोर्चा......
करंजाडे वसाहतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याबाबत एमजेपी, सिडको कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने आता नागरिक स्वतः हुन रस्त्यावर उतरत असून 3 ऑगस्ट 2023 रोजी सिडको विरोधात काढण्यात येणारा जलआक्रोश मोर्चा हा कोणतीही संघटना किंवा पक्षाचा नसून करंजाडे नागरिक म्हणून मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आढावा बैठकीत करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी सांगितले.
Post a Comment