पनवेल मनसेतर्फे शेडुंग टोल प्रशासनाला असुविधेबाबत निवेदन : अन्यथा मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरावे लागेल
पनवेल : मुंबई-पुणे महामार्गावरील शेडुंग टोलनाक्यावरील असुविधेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका टिमतर्फे मॅनेजर पामरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी पदाधिका-यांनी निवेदन देताना स्थानिकांना टोल माफी व टोलनाका प्रशासनाची अँब्युलन्स, टोईंग व्हॅन तसेच टोल नाका परिसरात २०० मीटरच्या आत शौचालय, रोज होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याबाबात उपाययोजना करावी अन्यथा मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा दिला. यावेळी मनसे पनवेल तालुका टीमचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment