शेतीचे नुकसान व घरात पाणी शिरल्याने शेतक-यांना नुकसान भरपाई द्या: मनसेची तहसिदारांकडे मागणी
पनवेल (वैभव लबडे) : सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल तालुक्यातील शेतीचे नुकसान व घरात पाणी शिरल्याने शेतक-यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका पदाधिका-यांनी तहसिदार विजय पाटील यांची भेट घेऊन शेतक- यांना नुकसान भरपाई मिळावी याबाबतचे निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष रामदास पाटील, तालुका सचिव अमोल पाटील, तालुका उपाध्यक्ष चिंतामणी मुंगाजी,भातान शाखाध्यक्ष विजय ठाकूर, खानावळे शाखाध्यक्ष आकाश पाटील, जड अवजड वाहतूक सेना जिल्हा संघटक विजय जाधव, सुकापूर शाखाध्यक्ष जयवंत बाबरे, नितळस शाखाध्यक्ष नितेश पाटील, प्रवीण पाटील, संतोष गायकवाडी, सोनी बेबी आदी पदाधिका-यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment