शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या नव्या मुंबईतील सभेस भिमशक्तीचा विरोध
पनवेल - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नव्या मुंबईत होणाऱ्या सभेस भीमशक्तीने विरोध केला आहे.
नव्या मुंबईतील कोपरखैरणे येथे रविवार दि.१६ जुलै २०२३ रोजी स्वर्गीय अण्णासाहेब स्मृती भवनांमध्ये शिवप्रतिष्ठांचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सभेस हरकत असून या सभेस परवानगी देऊ नये असे पत्र भीमशक्तीचे पनवेल तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.गायकवाड यांच्यासोबत भीमशक्तीचे सागर पगारे, पंकज गायकवाड,आदित्य शिंदे,नरेश जाधव,सुरेंद्र जाधव व इतर उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या पोलीस स्टेशनच्या पत्रामध्ये पाच हरकती घेतल्या आहेत, त्यामुळे सामाजिक व जातीय तेढ निर्माण करून कायदा सुव्यवस्था बिघडवणारे विधान करणारे संभाजी भिडे व त्यांच्या संघटनेचे कार्यक्रम आणि सभेसाठी परवानगी मिळू नये याकरिता सर्व भीम अनुयायी एकत्र येऊन या कार्यक्रमास विरोध करत आहेत असे पत्रकात म्हटले आहे.
Post a Comment