मित्र ...पैसे ..भांडण-शिवीगाळ ..सुरा..शीर धडा वेगळे करून खून : आरोपीला बेड्या, पनवेल शहर पोलिसांची कामगिरी
पनवेल -पैशाच्या कारणावरून मित्राचे शीर धडा वेगळे करून खून करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलीस आणि ठोकल्या बेड्या ठोकल्या आहेत.पनवेलमधील महंमद असलम आशमद (वय-४२) पनवेल मधील जुन्या कोर्ट येथे राहत असलेली ही व्यक्ती हरवल्याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.
या कामी पोलिसांकडून तपास पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने दिवस रात्र अथक परिश्रम करुन हरविलेल्या व्यक्तीच्या शोधकामी हरविलेल्या व्यक्तीचे मोबाईलचे सीडीआर,मिसींग झाले ठिकाणच्या परिसरातील प्राप्त केलेले सीसीटीव्ही फुटेज यांचा तांत्रिक तपास केला.तपासादरम्यान यातील मिसींग व्यक्तीला त्याचा मित्र नामे शफिक हैदर याच्या सोबत शेवटचे पाहिले असल्याबाबत माहिती समोर आली. त्यावरुन शफिक हैदर याच्याबाबत तपास केला असता तो वडघर, पनवेल येथून अचानक त्याचा मोबाईल बंद करून मुळ गावी उत्तरप्रदेश येथे जात असल्याबाबत माहिती समोर आली.
त्यावरुन शफिक अली हैदर याच्याबाबत अधिक तांत्रिक तपास करून त्यास तपासपथाकाने भोपाळ, मध्यप्रदेश येथे रेल्वेतून विचारपूस करण्यासाठी थांबिवले. त्याच्याकडे यातील मिसींग व्यक्तीबाबत अधिक तपास केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करत असल्याचे दिसून आले. त्यावरुन मिसींग व्यक्तीचे काहीतरी बरेवाईट झाले असल्याबाबत संशय बळावला.
शफिक अली हैदर याच्याकडे तपासपथकाने केलेल्या तपासामध्ये त्याने महंमद अस्लम हाश्मद,वय 42 वर्षे याच्याबरोबर पैशांच्या कारणावरुन झालेल्या भांडणाचा व शिवीगाळीचा राग मनात धरुन चिंचपाडा, पुष्पक नोड, वडघर, ता- पनवेल या ठिकाणी अस्लम याचे मानेवर मासे कापण्याच्या सुऱ्याने वार करुन त्याचे मुंडके धडावेगळे करुन खून केला तसेच खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे धड 3/4 नायलॉनच्या गोणी एकात एक भरून प्रेत भरून चिंचपाडा, कळंबोली सर्वीस रोडचे डावे साईडला रस्ताचे कडेला टाकून दिले व मुंडके करंजाडे येथील नाल्यात टाकले असल्याचे सांगितले.
सदर गुन्ह्यात आरोपीत शफिक अली हैदर वय 43 वर्षे, राह- वडघर, पनवेल, मुळ राह- सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश यास अटक करण्यात आली असून आरोपी याच्याकडे केलेल्या तपासात त्याने मयताचे धड ज्या ठिकाणी टाकले सदरचे ठिकाण दाखवले त्याप्रमाणे आरोपीत याच्या सांगण्याप्रमाणे मयताचे मुंडके नसलेले धड मिळून आले आहे. सदरचे धड शवविच्छेदनाकरीता उपजिल्हा रुग्नालय,पनवेल येथे पाठवण्यात आले आहे. सदर गुन्हयाचापुढील तपास श्री. नितीन ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई हे करत आहेत.
Post a Comment