प्रबोेधनकार ठाकरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा : प्रबोधनकार युवा वक्ता पुरस्काराने सन्मान होणार
पनवेल - कोकणातील राजापूर तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या ज्ञानवंत अॅड.वासुदेव तुळसणकर ज्ञानसंकुलातर्फे प्रबोेधनकार ठाकरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरची स्पर्धा मंगळवार दि. 12 व 13 सप्टेंबर 2023 रोजी गुरूवर्य शहाजी भाऊराव खानविलकर सभागृह, नुतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेकरिता 1) दीड जी.बी.डेटा...आयुष्य का फुकट घालवतो बेटा? 2) कोणता झेंडा घेऊ हाती ... 3) संविधान खतरे में-किती खरे किती खोट? 4) भारताची विदेशी निती-पूरक की मारक? 5) लोकशाही लोकांची की शाही लोकांची हे विषय वक्तृत्व स्पर्धेचेे असून यामध्ये प्रबोधनकार युवा वक्ता पुरस्कार 2023 दिला जाणार असून त्यामध्ये सर्वोत्तम तीन विजेत्यांना प्रत्येकी 7,500 रू. सन्मानचिन्ह-सन्मानपत्र व तीन उपविजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी 2,000 रू. व प्रमाणपत्र देण्यात येईल.
पारितोषिक वितरण समारंभाला अखिल भारतीय मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद सबनीस हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी विनोद मिरगुले - 9970953600, 8668810177, महेश पवार - 8149184864 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment