रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी मनिषा पिंगळे
पनवेल- रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी मनिषा पिंगळे रुजू झाल्या आहेत.जिल्हा माहिती कार्यालय,रायगड- अलिबाग येथील जिल्हा माहिती अधिकारी या पदी प्रशासकीय बदलीने नियुक्ती झाली असून जिल्हा माहिती अधिकारीपदाचा कार्यभार मनोज शिवाजी सानप यांचेकडून स्वीकारला.यावेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधी व मान्यवरांनी जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती पिंगळे यांचे स्वागत केले तसेच ठाणे जिल्हा माहिती अधिकारीपदावर बदली झालेले मनोज सानप यांना निरोप दिला.
जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती पिंगळे यांनी यापूर्वी मंत्रालयात तत्कालीन गृहमंत्री यांच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात प्रकाशने शाखेत वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून व विभागीय संपर्क अधिकारी पदावर काम केले आहे.याबरोबर पालघर जिल्ह्याच्या प्रथम जिल्हा माहिती अधिकारी व ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. या कालावधीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शासकीय उपक्रमांसाठी काम करताना त्यांनी योगदान दिले आहे,
तसेच किरण रा.वाघ यांची जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग येथील रिक्त असलेल्या माहिती अधिकारी या पदी प्रशासकीय बदलीने नियुक्ती झाली असून त्यांनी देखील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
Post a Comment